मी एक सामान्य माणूस आहे. जो रोज सकाळी उठून आपल्या घराला सुख सोयी नुसार घर चालण्यासाठी धडपड करत असतो. पण दररोज घराबाहेर पडल्या नंतर नोकरी वर गेल्यावर तिथे सुद्धा मी माझा प्रामाणिक पण सोडत नाही. तिथे कितीही प्रमाणात ताण आला तरी सहन करून पुढेचालणारा मी एक सामान्य माणूस. कारण जर मी तिथे माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला तर माझीच दमदाटी केली जाईल आणि जर जे काम आपल्याला करायचे आहे ते दुसऱ्या वळणावर जात असेल तरी त्याचा स्वीकार करावा लागतो, का तर माझी नोकरी जाईल. आणि माझे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाईल.
मग या सामान्य माणसाने आपले मन कुठे हलके करायचे तेच त्याला कळत नाही, म्हणून तो त्याच दडपणाखाली आयुष्य जगात राहतो. प्रशासनात सुद्धा जवळ पस सगळ्याच गोष्टीचा अतिरेक होतो जसे कि नोटबंदी, बँकेचे वाढणारं व्याजदर (कारण सामान्य माणसाला कर्ज घेतल्याशिवाय शिवाय पर्याय नसतो ) , वाढती महागाई, घरच्या मुलांचे किंवा आई वडील यांचे आजारपण सुद्धा तिथं सुटणार नाही.
आजार पण असे आहे कि जिथे आपल्याला थोडीशी मेडिसिन बद्दल माहिती असेल तरीही आपल्याला डॉक्टर च्या पुढे जाता येणार नाही त्याने जी औषध लिहून दिली आहे तीच घ्यावी लागेल स्वस्त चालणार नाही आणि आपण त्याला जुमानून जर औषधी घेतली तर तुम्हाला इथे इलाज करायचा असेल तर करा नाहीतर तुम्ही खुशाल दुसरी कडे जाऊ शकता असे वाक्य डॉक्टरांकडून ऐकण्यापेक्षा तो जो सांगेल ते ऐकावेच लागेल कारण तिथे माणसाचा जीव महत्वाचा आहे हे विचार त्याच्या डोक्यात येतात. मग पैसे नसताना सुद्धा कुठून तरी तडजोड करून तो संसाराची गाडी पुढे नेत असतो. नोकरी वरून घरी आल्यानंतर मुलांसाठी आपल्याला त्याच्या नव्या शाळेत टाकण्यासाठी पैश्याची तजवीज करावी लागणार आहे हे जाणीव किंवा कुणकुण त्याला लागलेलीच असते . या समाजात टिकायचे असेल तर आपल्या मुलाचे संगोपन चांगलेच झाले पाहिजे असे कोणत्याही माणसाला वाटत असते.
त्यासाठी सुद्धा तो पैश्याच्या तडजोडी चे बघत असतो. प्रशासनाने मोठमोठ्या शाळेवर काही तरी बंधन घातली पाहिजेत जेणे करून त्याच्या पाल्याचे शिक्षण तो करू शकेल. पण त्याचे ऐकणार कोण, हि बाब त्याच्या मनात घुडदूस घालून राहते. तरीही मुलांचे शिक्षण तो आदी अडचणींना सामोरे जाऊ पूर्ण करतो जेणे करून तो त्याच्या पायावर उभा राहील. मुलं मोठी होऊन त्यांच्या पायावर उभा राहतात. ते त्यांच्या आयुष्यात मग्न झाल्यानंतर लक्षात येते आपण आपल्या म्हातारपणाची तजवीज केली नाही. तेव्हाच जर माझे मन मी मोकळे केले असते तर असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जरी आपण आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला तर आपले ऐकणारे कोणी नसते. आपले वाटणे तसेच ठेवून त्याचे जीवन तो देवा पुढे समरप्रीत करतो.
सामान्य माणसाचे जीवन गाथा सामान्य माणसांसाठी समर्पित.
Comments
Post a Comment